पुरंदर रिपोर्टर Live
सोमेश्वरनगर. प्रतिनिधी.
मु. सा. काकडे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत “ई-कन्टेन्ट डेव्हलपमेंट” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीसाठी आवश्यक असणाऱ्या डिजिटल साधनांचे प्रशिक्षण देणे हा होता.
या कार्यशाळेसाठी शारदाटेक एज्यु इक्विपमेंट इंडिया प्रा. लि. चे संचालक संजीव तुपे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे व्हिडिओ निर्मितीची प्रक्रिया, आवश्यक सॉफ्टवेअर, तसेच ई-कन्टेन्ट तयार करताना लक्षात घेण्यासारखे तांत्रिक आणि शैक्षणिक घटक यांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला.
या कार्यशाळेत महाविद्यालयातील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ई-कन्टेन्ट निर्मितीबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये डिजिटल शिक्षणाबाबत नवीन ऊर्जा व प्रेरणा निर्माण झाल्याचे मत सहभागींकडून व्यक्त करण्यात आले.
प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तर ग्रंथपाल प्रा. रविकिरण मोरे यांनी आभार व्यक्त केले.

0 Comments